कर्तृत्ववान महिलांचा योगेश्वरी विद्यालयात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:32 IST2021-03-10T04:32:48+5:302021-03-10T04:32:48+5:30

अंबाजोगाई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून योगेश्वरी नूतन विद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष ...

Honorable women felicitated at Yogeshwari Vidyalaya | कर्तृत्ववान महिलांचा योगेश्वरी विद्यालयात सत्कार

कर्तृत्ववान महिलांचा योगेश्वरी विद्यालयात सत्कार

अंबाजोगाई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून योगेश्वरी नूतन विद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे होते. व्यासपीठावर शाळेचे पदाधिकारी अलका साळुंके, एस.के. निर्मळे, ए.आर. पाठक, व्ही.के. गायकवाड, आर.व्ही. सोनवळकर उपस्थित होते.

याप्रसंगी कर्तृत्ववान महिला वर्षा घोडके व शेख मस्तानी यांना ‘आदर्श महिला पुरस्काराने’ मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी हेमंत धानोरकर, प्रणिता मोटाडे, वर्षा घोडके, शीला गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. माणिकराव लोमटे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

प्रारंभी मुख्याध्यापिका अलका साळुंके यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन भागवत मसने यांनी केले. उपमुख्याध्यापक एस.के. निर्मळे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व माहिला कर्मचारी व शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

===Photopath===

080321\23214b7dba290bf7439399389b75e7de9a31_14.jpg

===Caption===

कर्तृत्ववान महिलांचा योगेश्वरी विद्यालयात सत्कार

Web Title: Honorable women felicitated at Yogeshwari Vidyalaya