पालिका कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:28+5:302021-01-13T05:27:28+5:30
बीड : जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतमधील स्वच्छता व इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कोरोनाकाळात काम केले आहे. त्या ...

पालिका कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करा
बीड : जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतमधील स्वच्छता व इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कोरोनाकाळात काम केले आहे. त्या सर्वांचा प्रजासत्ताक दिनी कोरोना योद्धा म्हणून सन्मान करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटनेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
कोरोना काळात आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवेत जेवढे योगदान दिले, त्याच बरोबरीने नगरपालिका, नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनीही स्वच्छता व इतर सुविधा पुरविण्यात खूप मदत केली आहे. स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून सामान्यांच्या आरोग्यासाठी हे सर्व कर्मचारी २४ तास सेवेत होते. यात त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. परंतु या आपत्तीच्या काळात एकाही कर्मचाऱ्याने माघार घेतली नाही. त्यामुळे या सर्वांचे कार्यही दखलपात्र असून त्या सर्वांचा प्रजासत्ताकदिनी कोरोना योद्धा म्हणून सन्मान करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळकुटे, कार्याध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.