बीडमध्ये हनी ट्रॅप, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत गॅरेज चालकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 01:26 PM2022-01-06T13:26:56+5:302022-01-06T13:27:31+5:30

Honeytrap in Beed वाहन दुरुस्तीच्या कामानिमित्ताने त्यांची ओळख झाली होती.

Honey trap in Beed, robbing garage driver threatening rape | बीडमध्ये हनी ट्रॅप, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत गॅरेज चालकास लुटले

बीडमध्ये हनी ट्रॅप, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत गॅरेज चालकास लुटले

googlenewsNext

केज (जि. बीड) : भाड्याने कार घेऊन वाटेत साथीदारांकरवी गॅरेज चालकास मारहाण केली. बळजबरीने खांद्यावर हात ठेवायला लावून फोटो घेत बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याची धमकी देऊन एक लाख रुपये उकळले. हनी ट्रॅपचा हा धक्कादायक प्रकार ३ जानेवारी रोजी मध्यरात्री येथे घडला. याप्रकरणी ४ जानेवारी रोजी सात जणांवर गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, तिचे साथीदार फरार आहेत.

२७ वर्षीय तरुणाचे केजमध्ये गॅरेज आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मोहिनी भांगे (२७, रा. शिक्षक कॉलनी, केज) व तिच्या मामाचा मुलगा अशोक मिसाळ (रा. कोल्हेवाडी, ता.बीड) हे दोघेही त्यांच्या परिचयातील आहेत. वाहन दुरुस्तीच्या कामानिमित्ताने त्यांची ओळख झाली होती. ३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता मोहिनी भांगे हिने फोन करून अंबाजोगाई येथील दवाखान्यात पाहुण्यांना भेटायला जायचे असल्याचा बहाणा केला. गॅरेज चालक कार घेऊन मोहिनी भांगेला घेऊन अंबाजोगाईकडे गेला.

धारूरहून पुढे तीन ते चार कि.मी. अंतरावर गेल्यावर पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने ओव्हरटेक करीत कार आडवी लावली. गाडीतून उतरलेल्या एकाने गॅरेज चालकाला दुसऱ्या कारमध्ये बसविले. त्यानंतर त्याला एका निर्जनस्थळी नेत त्याच्या खात्यावरील ११ हजार रुपये हे तिच्या बँक खात्यात वळते करायला लावले. डिकीत ठेवलेले ९० हजार रुपयेही काढून घेत त्यास खांद्यावर हात ठेवायला लावून फोटो काढले. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा नाेंदवून आयुष्यभर कारागृहात टाकण्याची धमकी दिली.

दोन दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी मोहिनी भांगेला ताब्यात घेतले. तिला न्यायालयाने ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले.

Web Title: Honey trap in Beed, robbing garage driver threatening rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.