एसटी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; बसमध्ये सापडलेले सोन्याचे दागिने स्थानकात केले जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 17:26 IST2023-11-22T17:25:02+5:302023-11-22T17:26:14+5:30
लाखों रुपये किंमतीचे दागिने परत करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या प्रामाणीकपणाचे सर्वञ कौतूक होत आहे.

एसटी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; बसमध्ये सापडलेले सोन्याचे दागिने स्थानकात केले जमा
धारूर : पंढरपूर ते मेहकर बसने मंगळवारी दुपारी प्रवास करताना सापडलेले सोन्याचे दागिने एसटी महामंडळाच्या कार्यशाळेतील सहाय्यक कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे धारूरच्या बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकाकडे जमा केले. अंदाजे दीड लाख रुपये किंमत असलेला दागिना परत करणाऱ्या या कर्मचाऱ्याचे नाव लक्ष्मण रामचंद्र कुंभार असे आहे.
धारूर येथील असलेले लक्ष्मण कुंभार हे एसटी महामंडळाच्या बीडच्या कार्यशाळेत सहाय्यक कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी ते केज ते धारूर असा पंढरपूर-मेहकर बसमधून ( एम एच 7 सी 7153 ) प्रवास करत होते. गाडीमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. यातच कुंभार यांना बसमध्ये खाली पडलेले सोन्याचे दागिने आढळून आले. त्यांनी तत्काळ ते ताब्यात घेत बसच्या चालक- वाहकाला सोबत घेत धारूर बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकाच्या स्वाधीन केले. हा सोन्याचा दागिना जवळपास दीडलाख रुपये किंमतीचा आहे. लाखों रुपये किंमतीचे दागिने परत करणाऱ्या कुभांर यांच्या प्रामाणीकपणाचे सर्वञ कौतूक होत आहे.