शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:18 AM

ज्या पॅथीमध्ये उपचार घेऊन रूग्ण बरे झाले नाहीत त्या रूग्णांना होमिओपॅथीमुळे जीवदान मिळाले आहे. होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखवले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.गिरीष पटेल यांनी केले.

ठळक मुद्देगिरीश पटेल : केएसके होमिओपॅथी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र, माजी विद्यार्थी मेळावा

बीड : ज्या पॅथीमध्ये उपचार घेऊन रूग्ण बरे झाले नाहीत त्या रूग्णांना होमिओपॅथीमुळे जीवदान मिळाले आहे. होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखवले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.गिरीष पटेल यांनी केले. होमिओपॅथी विद्यार्थ्यांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे देशपातळीवर हे विद्यार्थी चमकत आहेत. बीडचा विद्यार्थी देशपातळीवर काम करतो याचे समाधान असून मानवाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचा वापर व्हावा असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी महाविद्यालयाच्या वतीने रविवारी पदवी पदव्युत्तर व डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मेळावा व राष्टÑीय सेमिनारचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ.डी.जी.बागल, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.प्रिया महिंद्रे, डॉ.अजित फुंदे, डॉ.बाळासाहेब पवार, डॉ.मंगेश जतकर, डॉ.प्रताप भोसले, डॉ.अन्वर अन्सारी, डॉ.एस. प्रविणकुमार, डॉ.संतोष महानोर, डॉ.अजित कुलकर्णी माजी विद्यार्थ्यांपैकी डॉ.राजेंद्र मुनोत आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. राजेंद्र मुनोतसह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.सुधीर निकम यांनी केले. डॉ.गणेश पांगारकर यांनी आभार मानले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत डॉ.महेंद्र गौशाल, प्राचार्य अरूण भस्मे, डॉ.गणेश पांगारकर, डॉ.भागवत मोटे, डॉ.गफर अली, डॉ.अजय कुलकर्णी, डॉ.नितीन राऊत यांनी केले.संस्थेच्या वतीने आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते डॉ.पटेल, डॉ. पवार, डॉ. विजयकर, डॉ.फुंदे, डॉ. भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अरूण भस्मे यांनी केले.हे सर्व काकूंमुळेच शक्य झाले - क्षीरसागरआ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, स्व.काकूंनी डिप्लोमा कोर्सच्या माध्यमातून सुरूवात केलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयात आता पीएच.डी.पर्यंतचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. जवळपास ४ हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण करून आपले व्यवसाय सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात होमिओपॅथीला मान्यता मिळावी यासाठी आपण सातत्याने शासनदरबारी प्रयत्न केले त्यामुळेच आज हजारो विद्यार्थी या विषयांमध्ये नवनवीन संशोधनाचे मार्ग शोधू लागले आहेत. हे सर्व स्व.काकूंमुळेच शक्य झाल्याचे आ.क्षीरसागर म्हणाले.संघटीत व्हाकुलगुरू डॉ.गिरीष पटेल म्हणाले की, डॉ.अरूण भस्मे एक कुशल आणि शिस्तबध्द प्राचार्य असून माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून संवाद साधता यावा आणि या माध्यमातून प्रत्येकाची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचावी हा मुळ उद्देश त्यांचा आहे. होमिओपॅथीला नवी ओळख निर्माण करण्यासाठी अनेकांचे योगदान आहे त्यात डॉ.भस्मे यांचा वाटा आहे. आत्मविश्वाच्या जोरावर एक विद्यार्थी आपले नाव उंचावू शकतो हे या सेमिनारच्या माध्यमातूनच कळते. होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी आता संघटीत होऊन या पॅथीला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडHealthआरोग्यJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर