ऊस जाळल्याच्या संशयावरुन मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:18 IST2019-03-24T00:17:10+5:302019-03-24T00:18:11+5:30

ऊस का जाळला, भरपाई दे असे म्हणत परमेश्वर सर्जेराव सगळे (रा. हनुमाननगर, टाकरवण) या शेतकऱ्यास मारहाण करुन काठीने डोके फोडल्याची घटना शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे घडली.

Hit by the suspicion of burning sugarcane | ऊस जाळल्याच्या संशयावरुन मारहाण

ऊस जाळल्याच्या संशयावरुन मारहाण

बीड : ऊस का जाळला, भरपाई दे असे म्हणत परमेश्वर सर्जेराव सगळे (रा. हनुमाननगर, टाकरवण) या शेतकऱ्यास मारहाण करुन काठीने डोके फोडल्याची घटना शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे घडली. याप्रकरण पाच जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मधुकर साहेबराव सगळे, ज्ञानेश्वर मधुकर सगळे, पांडुरंग साहेबराव सगळे, खंडू पांडुरंग गळे, संतोष मच्छिंद्र सगळे (रा. हनुमानगर, टाकरवण) यांचा आरोपींत समावेश आहे. ‘तू आमचा ऊस का जाळला, भरपाई करुन दे’ असे म्हणत मारहाण करुन जखमी केल्याचे परमेश्वर सगळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Hit by the suspicion of burning sugarcane