उष्णतेमुळे साप, विंचवाचा वावर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:55+5:302021-07-07T04:41:55+5:30

.... रानभाज्यांच्या अस्तित्वावर घाला शिरूर कासार : शेतातील गवत, तण हे काढणे खर्चाच्या दृष्टीने महागडे झाले आहे. त्याला पर्याय ...

The heat caused snakes and scorpions to grow | उष्णतेमुळे साप, विंचवाचा वावर वाढला

उष्णतेमुळे साप, विंचवाचा वावर वाढला

....

रानभाज्यांच्या अस्तित्वावर घाला

शिरूर कासार : शेतातील गवत, तण हे काढणे खर्चाच्या दृष्टीने महागडे झाले आहे. त्याला पर्याय म्हणून तणनाशक फवारणी केली जाते. या फवारणीमुळे गवताबरोबर रानभाज्यासुद्धा वाळून जात असल्याने रानभाज्याचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. रानभाज्या बगर खर्ची, सर्व प्रकारचे जीवनसत्त्व पुरविणाऱ्या, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आहेत. ते मोफत मिळणारे टाॅनिक मानले जाते. यासाठी रानभाज्यांचे जतन करणे गरजेचे आहे.

...

बांधकामाचा धडाका, विटांचे भाव दुप्पट

शिरूर कासार : तालुक्यात सध्या बांधकामाचा धडाका सुरू असल्याने भाजलेल्या विटांना मोठी मागणी आहे. परिणामी विटांचे हजारी भाव दुप्पट झाले आहेत. ६ ते १० हजार रुपयांपर्यंत आहेत. यामुळे घरबांधकाम करणारे आर्थिक अडचणीत आले आहेत.

....

जनावरांचा बाजार मोडकळीला

शिरूर कासार : नऊ महिन्यांपासून पशुधनाच्या खरेदी-विक्रीचा बाजार कोरोनाने बंद ठेवला आहे. सोमवारी भरणाऱ्या बैल बाजाराची जागा सुनसान दिसत असते. बाजारच भरत नसल्याने जागेवरच खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याने आपल्या पशुधनाला पाहिजे तेवढी किंमत मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. आता रुग्णसंख्या घटली आहे. बहुतांश व्यवहार सुरू झाले. बैल बाजारालासुद्धा आता परवानगी मिळाली पाहिजे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

....

सायंकाळच्या शतपावलीला पसंती

शिरूर कासार : घरची सगळी आवराआवर झाली आणि जेवण झाल्यानंतर सायंकाळी शतपावलीला पसंती दिली जात आहे. जेवढे जमेल तेवढी पायपीट करण्यात महिलांचादेखील सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

Web Title: The heat caused snakes and scorpions to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.