शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! पत्नीला वाचवण्यासाठी पतीची विहिरीत उडी; मुलाच्या समोरच दोघांचाही बुडून अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:54 IST

वाघेबाभुळगाव शिवारात घटना, एका क्षणात पवार दाम्पत्याचा अंत

केज (बीड): केज तालुक्यातील वाघेबाभुळगाव शिवारात शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी एका अत्यंत हृदयद्रावक दुर्घटनेत पती-पत्नीचा दुर्दैवी अंत झाला. विहिरीत पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीनेही विहिरीत उडी घेतली, मात्र दोघांनाही नियतीने गाठले. एका क्षणात अतूट नात्याची शोकांतिका घडल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाणी काढताना काळ आला आणि दोघांना घेऊन गेलावाघेबाभुळगाव शेजारील पवारवाडी येथील शेतकरी भास्कर विनायक पवार, त्यांची पत्नी अल्का पवार आणि मुलगा ऋषिकेश हे तिघेही शुक्रवारी त्यांच्या शेतात खुरपणी करत होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अल्का पवार या पिण्यासाठी विहिरीतून पाणी काढत होत्या. अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या विहिरीत पडल्या. पत्नीला बुडताना पाहून पती भास्कर पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता, पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. 'मी तुझ्याशिवाय नाही' याच अविर्भावाने त्यांनी पत्नीला वाचवण्याचा जीवतोड प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बचावासाठी योग्य आधार न मिळाल्याने, अल्का पवार आणि भास्कर पवार या दोघा पती-पत्नीचाही विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

मुलाच्या समोरच आई- वडिलांचा मृत्यूही सर्व घटना त्यांच्या मुलाच्या (ऋषिकेश) डोळ्यांदेखत घडल्याने मोठी शोकांतिका निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुग्रीव शंकर पवार यांच्या खबरेवरून केज पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy in Beed: Husband dies trying to save wife from well.

Web Summary : In a heartbreaking incident in Beed, a farmer couple died after the wife accidentally fell into a well. The husband jumped in to save her, but both drowned in front of their son. The incident has cast a pall of gloom over the village.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याDeathमृत्यू