शेरी येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:33 IST2021-03-17T04:33:48+5:302021-03-17T04:33:48+5:30
आष्टी : पोलिसांचा तणाव कमी करण्यासाठी अमरावती येथील प्रा. डॉ. शिवाजी कुचे हे विविध कार्यशाळेतून पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या काळजीबाबत ...

शेरी येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य कार्यशाळा
आष्टी : पोलिसांचा तणाव कमी करण्यासाठी अमरावती येथील प्रा. डॉ. शिवाजी कुचे हे विविध कार्यशाळेतून पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या काळजीबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
सततच्या कामामुळे पोलिसांवर कामाचा ताण असतो. सध्या तर कमी मनुष्यबळामुळे पोलिसांवर अधिकच ताण पडत आहे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पोलिसांच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांवर तसेच कुटुंबावर जाणवतो. ध्यानधारणेमुळे पोलिसांच्या मनावरील ताण तणाव कमी होण्यास मदत होते. त्याची कार्यक्षमता वाढू शकते. पोलिसांच्या शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.
जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी ही बाब मनावर घेऊन पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी त्यांनी बीड जिल्हा पोलीस दलासाठी पुढाकार घेतला आहे. पोलिसांचा तणाव कमी करण्यासाठी अमरावती येथील प्रा. डॉ. शिवाजी कुचे यांना बोलावून मार्गदर्शन केले जात आहे.
बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवून, कोरोनासंदर्भात सर्व नियम पाळून कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुरुवात आष्टी उपविभाग येथे करण्यात आली. या उपक्रमात १५ मार्च रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत आष्टी तालुक्यातील शेरी येथील एका मंगल कार्यालयामध्ये शिरूर, अंमळनेर, पाटोदा, आष्टी, अंभोरा ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रा. डॉ. कुचे यांनी सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानसिक ताण-तणाव कशा पद्धतीने कमी करावा यासंदर्भात माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेतले.
===Photopath===
160321\img-20210316-wa0201_14.jpg
===Caption===
आष्टी तालुक्यातील शेरी येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराला सोमवारी प्रारंभ झाला.