हार्वेस्टरचे यंत्र सुटून सालगडी चिरडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 22:56 IST2020-03-06T22:55:00+5:302020-03-06T22:56:19+5:30
हार्वेस्टरच्या मागील सुटलेल्या काढणी यंत्राच्या चाकाखाली चिरडून एक इसम जागीच ठार झाला. हा अपघात धारुर महाविद्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.

हार्वेस्टरचे यंत्र सुटून सालगडी चिरडला
धारूर : हार्वेस्टरच्या मागील सुटलेल्या काढणी यंत्राच्या चाकाखाली चिरडून एक इसम जागीच ठार झाला. हा अपघात धारुर महाविद्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती देऊनही पोलीस अर्धा तासानंतर घटनास्थळी पोहचले.
सदर होर्वेस्टर (क्र. पीबी ११, बीएन ४२९६) हे केजकडून तेलगावकडे जात होते. सायंकाळी धारूर रोडने ते जात असताना कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयासमोर हार्वेस्टरच्या मागील काढणी यंत्र अचानक निसटले आणि यात रस्त्याने जाणारा पादचारी चिरडला.
सध्या विविध स्वरु पाचे धान्य काढण्यासाठी तालुक्यात हार्वेस्टरची मागणी वाढली आहे. पंजाब राज्यातून असे हार्वेस्टर सध्या या भागात दिसून येत आहे. यातच निष्काळजीपणामुळे शुक्रवारी हा अपघात झाला. या अपघातातील मयताचे नाव विष्णू गंगणे असे सांगण्यात आले असून परिसरातीलच शिनगारे यांच्या शेतात तो सालगडी म्हणून काम करत होता.