श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी परळीत हर हर महादेवाचा गजर...

By अनिल लगड | Updated: August 22, 2022 14:53 IST2022-08-22T14:52:39+5:302022-08-22T14:53:37+5:30

आज शेवटचा श्रावण सोमवार असल्याने श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली होती.

Har Har Mahadev's chanting in Parli on the last Monday of Shravan... | श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी परळीत हर हर महादेवाचा गजर...

श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी परळीत हर हर महादेवाचा गजर...

परळी(जि.बीड.) : ओम नमः शिवायचा जप व हर हर महादेवचा.. जयघोष करीत सोमवारी हजारो शिवभक्तांनी  व आंतराष्ट्रीय कथावाचक प.पू.श्री. प्रदीप मिश्रा यांनी चौथ्या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

चौथ्या श्रावण सोमवारी ही पुष्पमाला व विद्युत रोषणाईने श्री वैद्यनाथ मंदिर सजले आहे.  आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने पहाटेपासूनच शिवभक्तांची श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी रीघ लागली आहे. महिला व पुरुष व पासधारक अशा तीन रांगा लावण्यात आल्या. येणाऱ्या भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोयही श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली.

आज शेवटचा श्रावण सोमवार असल्याने श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली होती. वैद्यनाथ मंदिर परिसरात प्रसाद साहित्य, बिल्वपत्र  या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती. श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व मंदिर पायऱ्यावर बॅरिकेट्स लावण्यात आल्याने हजारो  भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले.   
 

Web Title: Har Har Mahadev's chanting in Parli on the last Monday of Shravan...