शिवसंग्रामच्या वतीने बीड पालिकेवर हंडा बजाओ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST2020-12-27T04:24:11+5:302020-12-27T04:24:11+5:30
बीड : शिवसंग्रामच्या वतीने बीड शहरवासीयांच्या प्रश्नावर बीड पालिकेवर २८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हंडा बजाओ मोर्चा काढण्यात ...

शिवसंग्रामच्या वतीने बीड पालिकेवर हंडा बजाओ मोर्चा
बीड : शिवसंग्रामच्या वतीने बीड शहरवासीयांच्या प्रश्नावर बीड पालिकेवर २८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हंडा बजाओ मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांनी सांगितले.
मेटे म्हणाले की, बीड नगरपालिका मागील ३५ वर्षापासून क्षीरसागरांच्या ताब्यात आहे. एवढ्या वर्षांमध्ये बीड शहराचा विकासात्मक चेहरा-मोहरा बदलण्याचे काम त्यांनी करणे आवश्यक होते. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर निधी विकासाच्या नावाखाली बीड शहरासाठी येतो परंतु विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे कुरण करून बीड शहराचा विकास करण्याऐवजी बीड शहराला भकास करण्याचे काम सर्वच क्षीरसागरांनी मिळून केलेले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, भूमिगत गटार योजनेसाठी, स्वच्छता, घरकुलांसाठी शेकडो कोटीच्या योजना आलेल्या आहेत. परंतु क्षीरसागरांच्या घरातील भांडणामुळे आणि गैरव्यवहारामुळे सदरील कामे वर्षानुवर्षे रखडलेले पहायला मिळतात. त्याचा त्रास बीडवासीयांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. बीड शहराला अभिमान वाटावा, अशा पद्धतीचे काम या सर्व क्षीरसागरांनी मिळून काहीही केलेले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बीडवासीयांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शिवसंग्रामने वेळोवेळी आ.विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडवासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे आणि यापुढेही करत राहू, म्हणून शिवसंग्रामने रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे म्हणून आंदोलन केले, उपोषणे केलीत, स्वच्छता मोहीम हातामध्ये घेतल्या, गटारी साफ केल्या, नदी साफ केली. असे कार्यक्रम सातत्याने शिवसंग्राम राबवत आहे. आज सुद्धा मुबलक पाणी असताना पण बीडवासीयांना कुठे १५ दिवसांनी तर कुठे १० दिवसांनी नगरपालिकेकडून पाणी मिळत आहे. पाणी प्रश्नाबरोबरच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर शिवसंग्रामने येत्या २८ डिसेंबर २० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नगरपालिकेवर हंडा बजाओ मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये सर्व बीडवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांनी केले आहे