बीडमध्ये २५ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:11 IST2019-07-24T00:10:23+5:302019-07-24T00:11:24+5:30
अहमदाबादहून कर्नाटककडे गुटख्याचा ट्रक भरून जात होता. हीच माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा लावून बीड बायपासवर टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल २५ लाख रूपयांचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. तसेच १० लाख रूपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला.

बीडमध्ये २५ लाखांचा गुटखा जप्त
बीड : अहमदाबादहून कर्नाटककडे गुटख्याचा ट्रक भरून जात होता. हीच माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा लावून बीड बायपासवर टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल २५ लाख रूपयांचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. तसेच १० लाख रूपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला. चालकाला ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अहमदाबादहून एका टेम्पोमध्ये (जीजे ०१ ईटी २३६८) गुटखा भरून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी तात्काळ आपल्या पथकामार्फत बीड बायपासवर सापळा लावला. बंद टेम्पो अडविला. उघडनू पाहिले असता त्यामध्ये गुटख्याने भरलेल्या जवळपास १०० पोते असल्याचे दिसले. हाच टेम्पो नंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आला. यावेळी चालक जालुरे इरफान अहमद हुसेन (२९ रा.अहमदाबाद) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती देऊन गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोनि पाळवदे यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनमश्याम पाळवदे, पोह परमेश्वर सानप, साजेद पठाण, विकी सुरवसे, प्रदीप सुरवसे, चालक संजय जायभाये आदींनी केली.
चालकाकडून दिशाभूल
बीड बायपासवर पोलिसांनी टेम्पो अडविला त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता टेम्पो रिकामा आहे, कर्नाटकमध्ये चाललो आहे, असे खोटे सांगितले. पोलिसांना संशय वाटल्याने तपासणी केली, यावेळी टेम्पोमध्ये गुटख्याने भरलेली जवळपास १०० पोती आढळून आले.