किराणा दुकानाच्या आड गुटख्याचे गोदाम; पोलिसांच्या छाप्यात १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:50 IST2025-02-13T12:49:24+5:302025-02-13T12:50:38+5:30

धर्मापुरी येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्री चालू असल्याचे माहिती परळी ग्रामीणचे पोलिसांना मिळाली.

Gutkha warehouse in grocery store; Goods worth Rs 14 lakh seized in police raid in Dharmapuri | किराणा दुकानाच्या आड गुटख्याचे गोदाम; पोलिसांच्या छाप्यात १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

किराणा दुकानाच्या आड गुटख्याचे गोदाम; पोलिसांच्या छाप्यात १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

परळी : तालुक्यातील धर्मापुरी येथील एका किराणा दुकानात परळी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा टाकून १४ लाख रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गुटक्याची  अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी  हे  तपासणी करून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे  पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले. 

धर्मापुरी येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्री चालू असल्याचे माहिती परळी ग्रामीणचे पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे,  पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख लाल, निमोणे, विष्णू घुगे, पांडुरंग वाले ,गोविंद बडे सुनील अन्नमवार यांच्या पथकाने 12 फेब्रुवारी रोजी रात्री या किराणा दुकानावर छापा टाकला. यावेळी शासनाची बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ येथे आढळून आले. याची किंमत अंदाजे १४ लाख रुपये आहे. हा सर्व गुटखा परळी ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. गुटख्याची अवैध विक्री करणारे दोघेजण असून त्यांच्या विरोधात गुरुवारी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Gutkha warehouse in grocery store; Goods worth Rs 14 lakh seized in police raid in Dharmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.