शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कन्येच्या विवाहासाठी पालकमंत्र्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

गोविंद इंगळे यांनी २०१४ मध्ये आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली आहेत. त्यांच्या पत्नी दैवशाला यांना दीड ...

गोविंद इंगळे यांनी २०१४ मध्ये आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली आहेत. त्यांच्या पत्नी दैवशाला यांना दीड एकर जमीन असून राहण्यासाठी पत्र्याचे कुड असूनही मोठ्या हिंमतीने काबाडकष्ट करून चारही मुलींचे संगोपन करू लागल्या.

दरम्यानच्या काळात इंगळे कुटुंबाची माहिती शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करत असलेल्या ‘आधार माणुसकीचा’ उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांना समजल्यावर त्यांनी या कुटुंबातील चारही मुलींच्या शिक्षण-आरोग्य-विवाहाबाबतची जवाबदारी स्वीकारून, वेळोवेळी या कुटुंबास सहकार्य करत आहेत.

इंगळे कुटुंबातील मोठी मुलगी शीतल हिचा विवाह जमल्याची माहिती दैवशाला यांनी ॲड. संतोष पवार यांना कळविली असता पवार यांनी पालकमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक खंडू गोरे यांची भेट घेऊन इंगळे कुटुंबातील मुलीच्या विवाहसाठी मदत करण्याची विनंती केली. २४ मे रविवार रोजी विवाहप्रसंगी वाल्मिक कऱ्हाड यांनी प्रतिनिधीमार्फत वीस हजार रुपयांची मदत इंगळे कुटुंबास देण्यात आली. विवाह प्रसंगी धनंजय मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

या विवाहासाठी सराफा व्यापारी अश्रूबा टाक यांनी वधूसाठी चांदीचे दागिने,तर भारज येथील वेंकटराव शिंदे यांनी वधू-आई यांच्यासाठी कपड्याचा आहेर दिला.

याप्रसंगी मुरकुटवाडीचे सरपंच बबनराव मुंडे,दरड वाडीचे सरपंच सज्जन दराडे,माजी सरपंच अशोक इंगळे, शिवहार भताने,बालासाहेब कातकडे,आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार, किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव उपस्थित होते.

===Photopath===

250521\img-20210524-wa0105_14.jpg