शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

GST अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरण; "पोलिसांनो, नाटकं बंद करा; गुन्हा दाखल करा, तरच दारापुढून उठू!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:35 IST

संतापलेल्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या ; पोलिसांची धावपळ

बीड : "एक प्रामाणिक अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून जीव देतो, आठवडा उलटूनही पोलीस केवळ 'चौकशी'चे तुणतुणे वाजवून गुन्हेगारांना पाठीशी घालतात. पोलीस अधीक्षकांचे नाव सांगून दिशाभूल करणे थांबवा. जोपर्यंत एफआयआर हातात पडत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याच्या दारातून हलणार नाही", असा आक्रमक पवित्रा घेत मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनानंतर आता बीड ग्रामीण पोलीस खरोखरच दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणार की पुन्हा 'तारीख पे तारीख' देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलीस ठाण्यात 'तू तू-मैं मैं'शुक्रवारी सायंकाळी जाधवर यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या कक्षात पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. "आमचा जीव गेला तरी चालेल, पण न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही", या भूमिकेवर आंदोलक ठाम होते. सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांची लोकांचा वाढता संताप पाहून अक्षरशः धावपळ उडाली. तसेच अधिकाऱ्यांनाही घाम फुटला होता.

पोलिसांची नमती भूमिकापोलीस ठाण्याच्या दारातच नातेवाईकांनी ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी नमती भूमिका घेतली आणि गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. मात्र, "पोलिसांच्या आश्वासनावर आमचा विश्वास नाही, जोपर्यंत एफआयआरची प्रत मिळत नाही तोपर्यंत ठाण मांडूनच बसणार", असे म्हणत रात्री ८ वाजेपर्यंत नातेवाईक ठाण्यातच बसून होते.

आरोपींना पोलिसांचे पाठबळ?सुसाईड नोटमध्ये स्पष्ट नाव असूनही आठवडाभर पोलीस कशाची वाट पाहत होते? एकीकडे कुटुंब उघड्यावर पडले असताना पोलीस मात्र तांत्रिक चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करून आरोपींना पळून जाण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ देत आहेत का? असा गंभीर आराेप वडवणीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांनी केला.

फोनाफोनी अन् धावपळपोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या कक्षात माजी आ. केशवराव आंधळे यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. गुन्हा दाखलची मागणी केली. यावेळी तपास अधिकारी सपोनि बाळराजे दराडे हे देखील उपस्थित होते. परंतु सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. वारंवार कक्षातून बाहेर जात मुदिराज फोनाफोनी करत होते. जवळपास तासभर हा खेळ चालला. लोकांचा वाढता रोष पाहून गुन्हा दाखलचे आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत बाहेर लोकांनी ठिय्या मांडला होता.

आम्हाला न्याय द्यावाआमची तक्रार घेतली जात नाही. सुसाईड नोट दाखवली जात नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे.मयुरी जाधवर, मयताची पत्नी

केवळ गवगवा होताेसचिन जाधवर यांच्या कुटुंबाला न्याय द्यायला हवा. पोलीस चांगले आहेत, असा केवळ गवगवा होताे. पण प्रत्यक्षात वेगळेच आहे. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत.संजय आंधळे, अध्यक्ष, युवा मोर्चा भाजप

English
हिंदी सारांश
Web Title : GST Officer Sachin Jadhav Suicide: Family Demands FIR, Protests Police Inaction.

Web Summary : Family protests police inaction in GST officer Sachin Jadhav's suicide case. They demand immediate FIR against senior officials named in the suicide note, alleging a cover-up and threatening to continue their protest until justice is served.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याGST Officeमुख्य जीएसटी कार्यालयBeedबीड