शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात बदनामी होईल या भीतीने मित्राची हत्या करणारा 'नवरदेव' गजाआड; बीड एलसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:56 IST

तरुणाच्या खुनाचा २४ तासांत उलगडा; लग्नाच्या आदल्या रात्री मित्रानेच केली हत्या

- सोमनाथ खताळ

बीड : पाटोदा तालुक्यातील डोंगरदेवी दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी (वय ३०) याच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चांदचा मित्र अतिक तांबोळी यानेच दीड लाख रुपयांच्या वादातून ही हत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याला मध्यरात्री बीड शहरातून बेड्या ठोकल्या आहेत.

लग्नातील गोंधळाच्या भीतीने केला खूनपोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत चांद याचे आरोपी अतिककडे १ लाख ५० हजार रुपये होते. तो या पैशांचा सतत तगादा लावत होता. विशेष म्हणजे, आरोपी अतिक याचे सोमवारीच लग्न होणार होते. "पैसे दिले नाहीत तर तुझ्या लग्नात येऊन गोंधळ घालेन," असा इशारा चांदने दिला होता. यामुळे चिडलेल्या आणि लग्नात बदनामी होईल या भीतीने ग्रासलेल्या अतिकने रविवारी रात्री चांदला गाठले आणि दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली.

एलसीबीची वेगवान चक्रेसोमवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात दहशतीचे वातावरण होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत आरोपी अतिक तांबोळीला बेड्या ठोकल्या.

काय घडले होते त्या रात्री?चांद रविवारी बीडला आला होता, तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याने पुतण्याला फोन करून "गाडी हॉटेलवरून घेऊन जा, मला उशीर होईल," असे सांगितले होते. ही त्याची शेवटची विचारपूस ठरली. ज्या मित्राच्या लग्नासाठी सर्व तयारी झाली होती, त्याच मित्राने दीड लाखांसाठी चांदचा काटा काढल्याने रायमोह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom Arrested for Murdering Friend Over Wedding Disruption Fear

Web Summary : A groom in Beed, fearing his friend would disrupt his wedding over a ₹1.5 lakh debt, murdered him. Police arrested the groom within 24 hours. The victim had warned he would create chaos if the money wasn't repaid.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारीBeedबीड