शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी कामांना सुरुवात होईल तेव्हाच आभार; तोपर्यंत ‘आभार सदृष्य धन्यवाद’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 17:23 IST

दुष्काळ जाहीर करा नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा दिल्यानंतर आज सरकारने दुष्काळ सदृष्य स्थिती जाहीर केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बीड :  दुष्काळ जाहीर करा नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा दिल्यानंतर आज सरकारने दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ' दुष्काळसदृष्य स्थिती'  याचा समाचार घेत ठाकरे यांनी, दुष्काळी उपायांच्या कामाला खरी सुरुवात होईल, तेव्हा सरकारचे आभार मानू तोपर्यंत  ‘आभार सदृष्य धन्यवाद’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. 

बीड येथे शिवसेनेच्या गटप्रमुख, बूथप्रमुख, शाखा प्रमुख तसेच आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार कुठलाही विषय आली की चर्चा करत बसते, दुष्काळ जाहीर करायला मुहूर्त काढायचा काय? दुष्काळ जाहीर करायला सरकार विलंब लावत असेल तर लोकशाही मार्गाने हे सरकार पुढे जाईल असे वाटत नाही असेही ठाकरे म्हणाले. 

मला शिवसेनचा मुख्यमंत्री करायचा आहे ३० वर्षानंतर हिंदू सरकार सत्तेवर आले. मजबूत सरकार आले. राम मंदिर, हिंदूत्व, समान नागरी कायद्यासाठी आम्हीही प्रचार केला, पण पदरात काही पडले नाही आणि काही पडेल वाटत नाही असे ते म्हणाले. या सरकारने भ्रमनिरास केला, आजपर्यंत सगळ्यांचे अनुभव घेतले, आता शिवसेनेचा अनुभव का घ्यायचा नाही, मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, कारण मला राज्य उभारायचे आहे, असेही ठाकरे म्हणाले. 

जनता सरकार विरोधी मी सरकारचा विरोधक नाही, जनतेच्या बाजुने भांडतोय.  जनता ही  सरकारविरोधी असेल तर आम्ही काय करणार? अशी भूमिका मांडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच असा विश्वास व्यक्त केला. 

यावेळी व्यासपीठावर मराठवाडा संपर्क प्रमुख खा. चंद्रकांत खैरे, मंत्री अर्जनु खोतकर, मिलींद नार्वेकर, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक आदंसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBeedबीडdroughtदुष्काळChief Ministerमुख्यमंत्री