अंबाजोगाईजवळील बुट्टेनाथ परिसरात ग्रामसेवकाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 14:51 IST2019-03-04T14:50:34+5:302019-03-04T14:51:01+5:30

कुठल्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट नाही.

Gramsevak suicides in Buttenath area near Ambajogai | अंबाजोगाईजवळील बुट्टेनाथ परिसरात ग्रामसेवकाची आत्महत्या 

अंबाजोगाईजवळील बुट्टेनाथ परिसरात ग्रामसेवकाची आत्महत्या 

अंबाजोगाई (बीड ) : धारूर तालुक्यातील देवठाणा-जैतापूर-खामगाव ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक राजाभाऊ बन्सी जोगदंड (वय ४२, रा. येवता, ता. केज) यांनी अंबाजोगाई लगतच्या बुट्टेनाथ परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

राजाभाऊ जोगदंड हे सध्या अंबाजोगाई शहरा लगत पोखरी रोडवर वास्तव्यास होते. आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयातील मिटिंगला जाण्यासाठी ते घरातून बाहेर पडले होते असे समजते. मात्र, वाटेतच त्यांनी बुट्टेनाथ परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ याची माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना कळविली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यान, जोगदंड यांनी कुठल्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, मागील काही महिन्यापासून ते आर्थिक अडचणी आणि कामाचा तणाव यामुळे त्रस्त होते अशी त्यांच्या मित्रपरिवारात चर्चा आहे. राजाभाऊ जोगदंड यांचं पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Gramsevak suicides in Buttenath area near Ambajogai