शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शेतकऱ्यांच्या अनुदानावर सरकारी बाबूंचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:35 IST

अनेक गावांमध्ये एकाच शेतक-यांची नावे अनेक वेळा टाकून त्यांच्या नावे जास्तीची अनुदान रक्कम जमा करुन त्यामधून संबंधित गावातील तलाठ्यांनी पैसे लाटल्याचे प्रकार पुढे आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात २०१६ साली अतिवृष्टी झाली होती, त्यानुसार अतिवृष्टीबाधित शेतक-यांना ६८ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, अनेक गावांमध्ये एकाच शेतक-यांची नावे अनेक वेळा टाकून त्यांच्या नावे जास्तीची अनुदान रक्कम जमा करुन त्यामधून संबंधित गावातील तलाठ्यांनी पैसे लाटल्याचे प्रकार पुढे आले आहे. असाच प्रकार बीड तालुक्यातील अंधापुरी येथे घडल्याचे शेतक-यांनी सांगितले.अतिवृष्टीबाधित शेतक-यांचे ६८ कोटी रुपयांचे अनुदान मिळून जवळपास दीड महिना होत आहे. मात्र, अजून देखील जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी वंचित आहेत. तलाठ्याने दिलेल्या यादीनुसारच शेतक-यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम बँकेमार्फत वर्ग करण्यात येते. बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, गेवराई, माजलगाव, धारुर या तालुक्यातील शेतक-यांना हे अनुदान मिळाले आहे. या अनुदानाचा फायदा जवळपास ८५ हजार ८७५ शेतक-यांना होणार होता. एकाच शेतक-यांच्या नावे दोन वेळा पैसे टाकून त्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा गैरप्रकार बीड तालुक्यातील अंधापुरी येथे समोर आला आहे. तसेच निम्मे पैसे तलाठ्यांने घेतल्याचा आरोप देखील येथील शेतक-यांनी केला आहे.अंधापुरी येथील शेतक-यांना अतिवृष्टीबाधित शेतक-यांना जवळपास १७ लाख रुपये अनुदान मिळाले होते. त्याचे वाटप देखील सुरु झाले आहे. मात्र, ज्यावेळी यादीमधील नावे गावातील शेतक-यांनी पाहिली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, यादीमध्ये एकाच शेतक-याच्या नावे दोन वेळा अनुदान दिले आहे. तसेच कमी क्षेत्र असतानाही जास्त रक्कम दिली आहे. यासंदर्भात तलाठी हंगे यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती गावातील शेतक-यांनी दिली आहे.मोठे मासे गळाला लागण्याची शक्यताहा गैरप्रकार उघड झाला आहे असे संबंधित गावातील तलाठ्याच्या लक्षात आल्यानंतर ते १ महिन्याच्या सुटीवर गेल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. असाच गैरप्रकार बोंडअळी अनुदान वाटपात देखील झाला होता. या प्रकरणी योग्य चौकशी झाली तर मोठे मासे गळाला लागतील अशी प्रतिक्रिया देखील शेतक-यांनी दिली आहे.

टॅग्स :fundsनिधीCorruptionभ्रष्टाचार