आष्टीत बंदला चांगला प्रतिसाद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 17:20 IST2021-10-11T17:19:59+5:302021-10-11T17:20:31+5:30
आ. बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालयापासून मोटारसायकल तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.

आष्टीत बंदला चांगला प्रतिसाद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
आष्टी ( बीड ) : आष्टी तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या.
आ. बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालयापासून मोटारसायकल तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. प्रभारी तहसीलदार शारदा दळवी यांना आंदोलकांनी निवेदन दिले.
यावेळी आ. बाळासाहेब आजबे,मा.आ.साहेबराव दरेकर,युवा नेते यश आजबे,तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी,जिल्हाउपाध्यक्ष सतिश शिंदे,भाऊसाहेब लटपटे,सुनिल नाथ,शिवाजी राऊत,तालुकाध्यक्ष भाऊ घुले,युवकचे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब गर्जे,राम खाडे,काका शिंदे,संदिप आस्वर,किशोर हंबर्डे,विनोद निंबाळकर,अॅड.शार्दुल जोशी,अतुल शिंदे,मा.सरपंच जालिंदर गायकवाड,संदिप सुंबरे,सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब वाघुले,अशोक पोकळे,सरपंच उदमले,नाजीम शेख,आदी कार्यकर्ते महाविकास आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त असून दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्ष सलिम चाऊस यांनी दिली.