बीड जिल्हावासीयांना खुशखबर, अहमदनगर- आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचे उद्या उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:03 IST2022-11-16T18:02:45+5:302022-11-16T18:03:12+5:30
रेल्वेराज्यमंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन होईल.

बीड जिल्हावासीयांना खुशखबर, अहमदनगर- आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचे उद्या उद्घाटन
आष्टी (बीड) : अहमदनगर-न्यू आष्टी आणखी एक डेमू (DEMU) रेल्वे सेवा उद्यापासून सुरु होत आहे. अहमदनगर स्थानकाहून उद्या दुपारी 3.30 वाजता केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
अहमदनगर-न्यू आष्टी या (डेमू) रेल्वेची नियमित दुसरी फेरी दि. 17 रोजी दुपारी ३.३० वा.होणार आहे. रेल्वेराज्यमंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन होईल. या रेल्वेने आष्टी व जामखेड तालुक्यातील नागरिकांना फायदा होणार आहे. यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल. विद्यार्थ्यांना देखील याच लाभ होईल.
अशी असेल दुसऱ्या रेल्वे फेरीची वेळ
गाडी क्रमांक 01403 अहमदनगर-न्यू आष्टी, अहमदनगरहून दुपारी 03.40 वाजता सुटणार आणि नारायणडोहो आगमन 04.40 वा. प्रस्थान 04.42 वा. लोणी आगमन 04.58 वा. प्रस्थान 05.00 वा. सोलापूरवाडी आगमन 05.25 प्रस्थान 05.27, न्यू धानोरा आगमन 05.43 प्रस्थान 05.45 वा.कडा आगमन 05.55 वा. प्रस्थान 05.57 वा.आणि न्यू आष्टी सायंकाळी 06.30 वा. ला पोहचेल.
पुन्हा आष्टीवरून हिच गाडी क्रमांक 01404 न्यू आष्टी-अहमदनगर, न्यू आष्टीहून सायंकाळी 07.00 वा.ला सुटणार कडा आगमन 07.28 वा. प्रस्थान 07.30 वा.न्यू धानोरा आगमन 04.40 वा. प्रस्थान 07.42वा.सोलापूरवाडी आगमन 07.58 वा.प्रस्थान 08.00 वा.न्यू लोणी आगमन 08.25 वा.प्रस्थान 08.27,नारायणडोहो आगमन 08.53 वा.प्रस्थान 08.55.वा. अहमदनगरला रात्री 09.45 वाजता पोहचेल, अशी माहिती अहमदनगर रेल्वे प्रशासनाने दिली आहे.