बीडकरांसाठी खुशखबर; माजलगाव, गेवराई, केज तालुका झाला कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:03 IST2020-05-31T10:00:52+5:302020-05-31T10:03:30+5:30

जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २९

Good news for Beed citizens; Majalgaon, Gevrai, kaij taluka became corona free | बीडकरांसाठी खुशखबर; माजलगाव, गेवराई, केज तालुका झाला कोरोनामुक्त

बीडकरांसाठी खुशखबर; माजलगाव, गेवराई, केज तालुका झाला कोरोनामुक्त

बीड : मुंबईहून आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांवर १० दिवस उपचार करण्यात आले. रविवारी १४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहेत. आता एकूण कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 29 झाली आहे. माजलगाव, केज, गेवराई तालुका कोरोनामुक्त झाला आहे. 

बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६३ जणांची कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यात एकाचा मृत्यू झाला होता तर आतापर्यंत १५ जण कोरोनामुक्त झाले होते. सहा रुग्णांना पुण्याला पाठविले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ४१ रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील  माजलगाव तालुक्यातील १३ व बीड शहरातील एकाला प्रकृती ठणठणीत झाल्याने घरी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ २७ रुग्ण उपचारासाठी राहणार आहेत.

सर्व कोरोनाबाधित हे मुंबईहून आलेले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांच्या टिमने या सर्व रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले आहे. बीड जिल्ह्यासाठी ही सुखदवार्ता आहे.

Web Title: Good news for Beed citizens; Majalgaon, Gevrai, kaij taluka became corona free