राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पियूष रंजवेला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 20:05 IST2023-11-07T20:05:13+5:302023-11-07T20:05:35+5:30

राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी झाली निवड 

Gold medal to Piyush Ranjave in state level fencing competition | राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पियूष रंजवेला सुवर्णपदक

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पियूष रंजवेला सुवर्णपदक

अंबाजोगाई-: शहरातील पियूष दत्तराव रंजवे या विद्यार्थ्याने गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत  १४ वर्ष वयोगटात सुवर्णपदक पटकावले आहे.  या कामगिरीने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ ते ४ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात फॉइल सांघिक प्रकारात नागझरी येथील  माईर एम आय टी पुणे संचलित कै. दादाराव कराड विद्यालयाचा विद्यार्थी पियूष दत्तराव रंजवे याने सुवर्णपदक पटकावले. आता त्याची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.

क्रीडाशिक्षक पी .एस. घुले यांचे त्यास मार्गदर्शन लाभले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  डॉ. वि. दा. कराड, कार्यकारी संचालक  राजेश कराड, समन्वयक शुभांगी कराड यांच्या हस्ते पीयूषचे कौतुक करण्यात आले. यावेळी संचालक संगप्पा बनदवार, प्राचार्य  रामराजे कराड, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे स्वागत केले.

Web Title: Gold medal to Piyush Ranjave in state level fencing competition