शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

महावितरणच्या बंद कार्यालयाला हार घालून ग्रामस्थांचा रोष व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 12:26 AM

तालुक्यातील उमापूर गावातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व गावांत महावितरणचे अधिकारी येत नसल्याने या त्रासाला कंटाळून गावातील नागरिकांनी शनिवारी येथील महावितरणच्या बंद कार्यालयाला गांधीगिरी पद्धतीने हार घालून निषेध आंदोलन केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील उमापूर गावातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व गावांत महावितरणचे अधिकारी येत नसल्याने या त्रासाला कंटाळून गावातील नागरिकांनी शनिवारी येथील महावितरणच्या बंद कार्यालयाला गांधीगिरी पद्धतीने हार घालून निषेध आंदोलन केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या व सर्कलचे गाव असलेल्या उमापूर येथे विद्युत वितरण विभागाकडून गावातील विद्युत पुरवठा सतत व खंडित केला जात आहे. सध्या कडाक्याचे ऊन पडत असल्याने व वातावरणात गरमी जाणवत असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतांना दिसत आहे. त्यात वीज नसल्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासून गावातील विद्युत पुरवठा वेळी-अवेळी खंडित होत आहे. त्यातच अधिकारी व कर्मचारी हे गावात येत नसल्याने शनिवारी येथील महावितरणच्या बंद असलेल्या कार्यालयाला हार घालून गांधीगिरी पद्धतीने हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुबारक शेख, विलास कुरूंद, धनगड समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेड तालुकाप्रमुख सोपान दळवी, सामाजिक कार्यकर्ते रमेश मिसाळ ,अजय आहेर, आदर्श औटी, अमोल देशमुख, हकीम शेख, अरुण बनसोडे, संतोष नवपुते, नरसिंह तुरुकमारेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्यवस्थित व सुरळीत वीज पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरणagitationआंदोलन