शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पाण्याकडे दिले, आता मातीकडे लक्ष राहू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:00 IST

गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.

ठळक मुद्देपोपटराव पवार यांनी दिला समृद्धीचा मंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.

गेवराई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येथे आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाचा मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर स्व. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. व्यंकटेश्वरलू, शेकापचे विकास शिंदे, म. फउले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, अ‍ॅग्रो इनपुटचे राष्टÑीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, प्रगतशील शेतकरी दिलीप गोरे, आष्टीचे दत्ता काकडे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांतीलाल पटेल, कृषी विक्रेता संघटनेचे सत्यनारायण कासट, अभिनेता डॉ. सुधीर निकम, जालन्याच्या सीता राम मोहिते, परसराम भगत, पत्रकार दिलीप खिस्ती, संयोजक गणेश बेदरे, महेश बेदरे उपस्थित होते.

मंगळवारी मृदा दिनाचा संदर्भ जोडत पोपटराव पवार यांनी मातीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, विषारी औषधे, खतांचा मारा यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. हरित क्रांतीनंतर शेतीचे उत्पादन वाढले परंतु, उत्पादकता खालावत आहे. शरीराप्रमाणे मातीचे आरोग्य जपावे. शेतांमध्ये रोटाव्हेटरने कष्ट कमी केले, पण जमीन खराब झाल्याचे ते म्हणाले. २०३० पर्यंत गावात एकही व्यसनी व मधुमेहाचा एकही व्यक्ती नसला पाहिजे असा हिवरे बाजारने संकल्प केल्याचे सांगून आनंद मिळेल तेवढाच पैशाचा हव्यास करा, पीक पद्धती, खतांचे डोस याचा अभ्यास करा असे पवार म्हणाले. या वेळी सीता राम मोहिते यांनी आदर्श मार्केटिंगची सूत्रे स्पष्ट केली.

प्रास्ताविक गणेश बेदरे यांनी केले. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉ. उद्धव घोडके, डॉ. सुधीर निकम, डॉ. अशोक जाधव, ब्रम्हदेव सरडे, सचिन सारडा, विनोद नरसाळे, जुबेर पठाण यांना कृषी विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार देण्यात आले.कपाशी नोव्हेंबरपर्यंतचगुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कुलगुरु बी.व्यंकटेश्वरलू यांनी कापूस उत्पादकांनी समजुतदारपणाने घ्यावे. नोव्हेंबरपर्यंतच कपाशीचे पीक घेतले पाहिजे.दीर्घकालीन वाण घेऊ नका, बीटीसोबत रिफ्युजी (नॉन बीटी) वापरावे, विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच कृषी औषधे, खते वापरावीत असे आवाहनही कुलगुरुंनी यावेळी केले.