गेवराईत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन अट्टल गुन्हेगार ताब्यात; कुकरी, तलवार केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:37 IST2019-03-28T17:32:50+5:302019-03-28T17:37:48+5:30

कोंबींग ऑपरेशन दरम्यान पोलिसांची कारवाई

In Gevrai swords seized; two criminals arrested | गेवराईत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन अट्टल गुन्हेगार ताब्यात; कुकरी, तलवार केल्या जप्त

गेवराईत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन अट्टल गुन्हेगार ताब्यात; कुकरी, तलवार केल्या जप्त

बीड : गेवराई शहरात गेवराई पोलिसांनी अचानक कोंबींग ऑपरेशन राबवून साखर झोपेत असणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या घरावर छापा टाकला. यामध्ये कुकरी व तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरूवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.

सचिन दिगांबर दाभाडे (रा.दाभाडे गल्ली गेवराई) व नितीन भास्कर पोपळघट (रा.लोहार गल्ली, गेवराई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गुरूवारी पहाटेच्या सुमारास गेवराई पोलिसांनी अचानक कोंबींग ऑपरेशन राबविले. यामध्ये खुद्द उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जून भोसले, पोउपनिरी भूषण सोनार, अरविंद गटकुळ आदींनी सहभाग नोंदविला. विशेष पथके तयार केली. त्याप्रमाणे पोपळघट व दाभाडे यांच्या घरी अचानक छापे टाकले. दोघांच्याही घरातुन स्टीलची कुकरी आणि एक तलवार जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सव्वा किलो गांजाही जप्त
गेवराई शहरातीलच चितेश्वर गल्लीतील मोईन अमनउल्ला खान याच्या घरी छापा टाकून सव्वा किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: In Gevrai swords seized; two criminals arrested