'मॉब लीचींग'मधून हत्येच्या निषेधार्त गेवराईत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 16:26 IST2019-07-05T16:24:59+5:302019-07-05T16:26:42+5:30
घटनेच्या निषेधार्थ शहरात बंद पाळण्यात आला

'मॉब लीचींग'मधून हत्येच्या निषेधार्त गेवराईत मोर्चा
गेवराई (बीड ) : झारखंड येथे 'मॉब लीचींग'मधून तबरेज अन्सारी या युवकाची हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्त आज शहरात बंद पाळण्यात आला. तसेच दुपारी 2.30 वाजता मुस्लीम बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चास सुरुवात झाली. दरम्यान आंदोलकांच्या विविध घोषणांनी शहर दणाणले होते. शहरातील शास्त्री चौक,माळी गल्ली,बेदरे गल्ली, मोमीनपुरा, भवानी पेठ,मेन रोड,चितेंश्वर गल्ली मार्गे मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला. आंदोलकांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले. यात शहरातील व तालुक्यातील सर्वधर्मीय व्यापारी नागरिकांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. तहसिलदार यांना देण्यात आले.