फ्रेंडशिप, मैत्री, प्रेम अन् पळवून नेऊन भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये बलात्कार; बीडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:04 IST2022-02-18T15:21:48+5:302022-02-18T16:04:37+5:30
बीड : शहरातील एका अल्पवयीन मुलीशी तरुणाची सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. त्यानंतर ...

फ्रेंडशिप, मैत्री, प्रेम अन् पळवून नेऊन भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये बलात्कार; बीडमधील घटना
बीड : शहरातील एका अल्पवयीन मुलीशी तरुणाची सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. त्यानंतर तरुणाने तिला पळवून नेत पुण्यातील कात्रज परिसरात भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये बलात्कार केला. या तरुणाला १६ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
शेख समीर शेख अजिमोद्दीन (२१, रा. तेलगाव नाका, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची सोशल मीडियावर शहरातीलच नववीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, १० फेब्रुवारी रोजी त्याने मुलीला घेऊन बीडमधून पलायन केले. पुण्यातील कात्रज परिसरात फ्लॅट भाड्याने घेऊन ते तेथे राहिले. यादरम्यान, त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. १
१ रोजी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात बेपत्ताची नोंद केली. उपनिरीक्षक शैलेश शेजूळ, पो. ना. मोहसीन शेख यांनी तांत्रिक माहितीआधारे १६ रोजी कात्रज पोलीस चौकीपुढील एका हॉटेलमध्ये शेख समीरला पकडले. पीडित मुलीसह त्याला घेऊन पथक १७ रोजी पहाटे बीडमध्ये पोहोचले. मुलीच्या जबाबावरून बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटीचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक शैलेश शेजूळ यांनी दिली.
सिमकार्ड बदलून पोलिसांना गुंगारा
दरम्यान, आरोपी शेख समीर हा सतत सिमकार्ड बदलत असे. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लावणे अडचणीचे ठरत होते. मात्र, अखेर शिवाजीनगर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेच. गुन्हे कृत्यामुळे बी. एस्सी. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या शेख समीरचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय बनले आहे.
पलायनाचा प्रयत्न फसला
पोलिसांनी कात्रज परिसरातून त्यास अटक केल्यावर शेख समीरने जोराची भूक लागल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास जेवण देण्यासाठी हॉटेलात नेले. ही संधी साधून त्याने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यास पुन्हा पकडले.