चारचाकी अपघातात १३ महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 23:54 IST2019-08-22T23:54:07+5:302019-08-22T23:54:54+5:30
परतूर (जि. जालना) येथे जैन मुनींचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या माजलगाव येथील महिलांच्या चारचाकी गाडीला अपघात होऊन तेरा महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

चारचाकी अपघातात १३ महिला जखमी
माजलगाव : परतूर (जि. जालना) येथे जैन मुनींचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या माजलगाव येथील महिलांच्या चारचाकी गाडीला अपघात होऊन तेरा महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
माजलगाव येथील तेरा महिला एका चारचाकीमधून परतूर येथे गुरुवारी सकाळी जैन मुनींचे दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून पाथरी येथील साईबाबांचे दर्शन घेतले व सायंकाळी माजलगाव कडे परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खरात आडगाव फाट्यावर चारचाकीच्या समोर चालणाऱ्या एका टेंपोने अचानक ब्रेक लावल्याने चारचाकी त्यावर पाठीमागून आदळली. यामध्ये चारकाकीच्या काचा फुटल्या व ती बाजूच्या झाडावर आदळली.
या अपघातात चारचाकीमध्ये असलेल्या संतोषी रमेश ओस्तवाल, राजकुंवर रेदासणी, सपना किशोर दुगड, कल्पना संतोष मुगडीया, उज्वला संजय रेदासणी, पद्मा रेदासणी, रेणुका सुशील लोढा, वंदना दिलीप ललवाणी, प्रमिला शांतीलाल दुगड यांच्यासह १३ महिला जखमी झाल्या आहेत.
हा अपघात अचानक झाल्यामुळे महिलांच्या तोंड, हात पायांना जखमा होऊन मुका मार लागला आहे. तर चालक बाबासाहेब नागापूरकर देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ फाट्यावरील नागरिकांनी जखमींना खाजगी वाहनातून माजलगाव येथील विविध रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी जखमींच्या नातेवाईकानीं मोठी गर्दी केली होती.
दरम्यान अपघातातील टेंपोचालक त्याठिकाणी न थांबता भरधाव टेम्पो घेऊन निघून गेला. त्या टेम्पो चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.