शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

विवाहितेवर सामूहिक बलात्कार प्रकरणात चार आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 12:44 PM

Rape Case Beed News गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका विवाहितेवर १ जानेवारी २०१५ रोजी झाला होता बलात्कार

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील  घटना  जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल 

बीड : गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे पाच वर्षांपूर्वी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात चार आरोपींना उर्वरित आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी सुनावली.

गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका विवाहितेला बीडला जाण्यासाठी १ जानेवारी २०१५ रोजी एका जिपमध्ये चौघांनी बसवले. बीडला जात असताना एरंडगाव येथील निर्मनुष्य असलेल्या गायरानाच्या ठिकाणी घेऊन जात सामूहिक बलात्कार केला.  यानंतर महिलेला पाचेगाव येथील घरी घेऊन जात त्याठिकाणी पुन्हा आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच याची माहिती कोणाला सांगितल्यास पुन्हा अत्याचाराची धमकी दिली. घबारलेल्या पिडित महिलेने दुसऱ्या दिवशी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

या तक्रारीवरुन जिजा लालसिंग राठोड, अमोल मदन काष्टे, कुंडलिक बन्सी राठोड आणि नवनाथ बाबुराव जाधव  यांच्यावर सामूहिक बलात्कारासह इतर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी दोन दिवसात आरोपींना अटक केली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव सिंग यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. बीड जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. एकूण दहा साक्षीदार होते. यातील पंच साक्षीदार फितूर झाले. मात्र पीडित महिला, तिचा पती, वैद्यकीय अधिकारी, ओळखपरेड घेणारे नायब तहसीलदार, गुन्हा नोंदविणारे एपीआय तळेकर, तपासी अधिकारी गौरव सिंग यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश हेमंत महाजन यांनी निकाल दिला. यात चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

...अशी सुनावली शिक्षा न्यायाधिश हेमंत महाजन यांनी आरोपी जिजा राठोड, अमोल काष्टे, कुंडलिक  राठोड, नवनाथ जाधव यांना कलम ३७६ ड नुसार उर्वरित आयुष्यासाठी जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३६६, ४५८ नुसार प्रत्येकी ७ वर्षे शिक्षा व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड,  कलम ३९४ नुसार १० वर्षे शिक्षा व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड.च् कलम ३२४, ५०६ नुसार प्रत्येकी २ वर्षे शिक्षा व एकहजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. सहायक जिल्हा सरकारी वकील मिलिंद वाघिरकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीBeedबीड