क्षुल्लक कारणावरून ग्रामसेवकाला माजी सरपंचाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:13 IST2018-06-19T17:13:38+5:302018-06-19T17:13:38+5:30
सारडगावचे ग्रामसेवक नितीन गित्ते यांना माजी सरपंच सिध्देश्वर आघाव यांनी क्षुल्लक कारणांवरून शिवीगाळ करत मारहाण केली.

क्षुल्लक कारणावरून ग्रामसेवकाला माजी सरपंचाची मारहाण
परळी (बीड ) : तालुक्यातील सारडगावचे ग्रामसेवक नितीन गित्ते यांना माजी सरपंच सिध्देश्वर आघाव यांनी क्षुल्लक कारणांवरून शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी आघाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी कि, ग्रामसेवक नितीन गित्ते सोमवारी (दि. १८ ) दुपारी ४ वाजता पंचायत समितीमध्ये शासकिय काम करत होते. यावेळी सारडगावचे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर आघाव यांनी फोन न उचलण्याच्या कारणावरून गित्ते यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर गित्ते यांनी आघाव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून आघाव यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या परळी शाखेतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला. आज पंचायत समितीच्या सर्व ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संघटनेतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.