चेहऱ्यावर तलवारीनं वार करुन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 08:13 IST2019-03-25T07:44:14+5:302019-03-25T08:13:00+5:30
मारेकऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

चेहऱ्यावर तलवारीनं वार करुन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या
बीड: राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. परळी येथील उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड यांची पत्नी राष्ट्रवादीची नगरसेविका आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची पहाटेच्या सुमारास परळीतील उड्डाणलाखाली हत्या करण्यात आली. अज्ञातांनी त्यांच्या चेहऱ्यावर तलवारीनं वार केले. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र अंतर्गत वादातून ही हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पांडुरंग गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. या हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.