शिक्षक कॉलनीत जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:30 IST2019-10-27T00:29:58+5:302019-10-27T00:30:08+5:30
माजलगाव शहरातील शिक्षक कॉलनीत गुरुवारी अज्ञात चार चोरट्यांनी कडीकोंडा तोडून जबरी चोरी केल्याची घटना घडली.

शिक्षक कॉलनीत जबरी चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : माजलगाव शहरातील शिक्षक कॉलनीत गुरुवारी अज्ञात चार चोरट्यांनी कडीकोंडा तोडून जबरी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील शिक्षक राजाराम बाबासाहेब जाधव व कुटुंबीय घरात झोपलेले होते. यावेळी अज्ञात चार चोरट्यांनी गुरुवारी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान कडीकोंडा तोडला व घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी जाधव यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, नगदी रक्कम असा ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या घटनेमुळे जाधव कुटुंबिय घाबरलेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस सुरु झाल्याने फिर्याद देण्यास त्यांना उशीर झाला. शुक्रवारी त्यांनी माजलगाव शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भर वस्तीतील जबरी चोरीमुळे पोलिसांना एक प्रकारचे आव्हान चोरट्यांनी दिल्याचे दिसून येत आहे. तसेच झालेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत चोरट्यांना ताब्यात घेण्याची मागणी शिक्षक कॉलनीतील नागरिकांनी केली आहे. तपास सपोनि राठोड करीत आहेत.