आगीत २ एकरांतील ऊस भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:30 IST2019-11-24T00:30:08+5:302019-11-24T00:30:34+5:30

तालुक्यातील पुंगणी येथील शेतात मुख्य लाईनला शॉर्टसर्किट झाल्याने दोन एकर उसाने पेट घेतला.

Flame in 3 acres of sugarcane | आगीत २ एकरांतील ऊस भस्मसात

आगीत २ एकरांतील ऊस भस्मसात

माजलगाव : तालुक्यातील पुंगणी येथील शेतात मुख्य लाईनला शॉर्टसर्किट झाल्याने दोन एकर उसाने पेट घेतला. यात एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आग विझवली म्हणून पुढील अनर्थ टळला.
माजलगाव तालुक्यातील पुंगणी येथील बळीराम सखाराम पवार यांचे डुब्बा रोड लगत दोन एकर ऊस लागवडीचे क्षेत्र आहे. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी चार च्या सुमारास शेतातून गेलेल्या मुख्य लाईनमध्ये बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने शेतातील उसाने पेट घेतला. रवी शिंदे, महेश पवार, किसन राऊत यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविली.

Web Title: Flame in 3 acres of sugarcane