रस्ता दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST2021-02-05T08:29:14+5:302021-02-05T08:29:14+5:30
नियमांची ऐशीतैसी अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. ...

रस्ता दुरुस्त करा
नियमांची ऐशीतैसी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय.
काटेरी झुडपांचा त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किमी रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
सिग्नल सुरू करा
बीड : शहरातील मुख्य चौकात असलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे अनेक वेळा वाहनधारक, नागरिकांतून सुरू करण्याची मागणी होती, परंतु याची दुरुस्ती झालेली नाही.
पर्यावरण धोक्यात
अंबाजोगाई : शहर परिसरात वीटभट्ट्या आहेत. परवानगी नसतानाही भट्ट्या सुरू आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी होत आहे.