शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अन्नत्याग आंदोलनात पाचशे शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनास अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ...

अंबाजोगाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनास अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास ५०० किसान पुत्रांनी या अन्नत्याग आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण जि. यवतमाळ येथील बालासाहेब करपे आणि मालती करपे या शेतकरी कुटुंबाने आपल्या लेकरांसह सामूहिक आत्महत्या केली. शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या अशी नोंद या आत्महत्येची शासन दरबारी झाली. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या जाचक कायद्यामुळे आजपर्यंतच्या सर्व शेतकरी आत्महत्या होत आहेत, असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे. जोपर्यंत शेतकरी विरोधातील जाचक कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत अशा आत्महत्या सुरुच राहतील, त्यामुळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी किसानपुत्र आंदोलन गेली पाच वर्षांपासून सातत्याने करीत आहे. याच मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनाचा उपक्रम राबवला जात आहे. अंबाजोगाई शहरात हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबविला जात असून यावर्षी या आंदोलनास अंबाजोगाई, दैठणा, नांदेड, पूस, चनई, गडचिरोली, केज, पाटोदा, घाटनांदूर, माजलगाव तसेच अन्य गावांमधून प्रतिसाद मिळाला.

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

महाराष्ट्रात आणि देशात आजपर्यंत झालेल्या सर्व शेतकरी आत्महत्या या शेतकरी विरोधी जाचक कायद्यामुळेच झाल्या असून हे जाचक कायदे त्वरित रद्द करा या मागणीचे एक निवेदन येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांना देण्यात आले. यावेळी सुदर्शन रापतवार, कालिदास आपेट, ॲड. संतोष पवार, ॲड. संतोष लोमटे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, पुंडलिक बापू पवार, मनोहर कदम, डॉ. ‌ डी. एच. थोरात, जगदीश जाजू, गणेश चौधरी, लखन होके, विनोदकुमार बुरांडे, संजय आपेट, राजेंद्र रापतवार, आप्पाराव पांढरे आदी उपस्थित होते.

===Photopath===

190321\avinash mudegaonkar_img-20210319-wa0059_14.jpg

===Caption===

अंबाजोगाईत १९ मार्च रोजी शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भाने किसानपुत्रांनी अन्नत्याग आंदोलन केले.  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने प्रभावी अंमलबजावणी करण्याची  मागणी करणारे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांना देण्यात आले.