मरेपर्यंत सांभाळतो म्हणत ओढले प्रेमाच्या जाळ्यात, अत्याचारानंतर दिले हाकलून
By संजय तिपाले | Updated: August 24, 2022 17:51 IST2022-08-24T17:50:39+5:302022-08-24T17:51:11+5:30
विराज जगताप असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे.

मरेपर्यंत सांभाळतो म्हणत ओढले प्रेमाच्या जाळ्यात, अत्याचारानंतर दिले हाकलून
बीड: पतीने मारहाण केल्याने विभक्त झालेल्या महिलेला एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर स्वत:च्या मालकीचे घर किरायाने दिले. तुला व तुझ्या मुलीला मरेपर्यंत सांभाळतो, असे म्हणून प्रेमाच्या जाळ्यात ओढले व नंतर अत्याचार करुन हाकलून दिले. २३ ऑगस्ट रोजी शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत ही घटना उघडकीस आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, विराज जगताप असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पीडित २६ वर्षीय महिला भिगवण (ता.बारामती) येथे राहत होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी पतीने तिला मारहाण केली, त्यामुळे दोन मुले पतीजवळ ठेऊन मुलीसह पीडिता बीडमध्ये आली. मुलीला शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले तर ती एका हॉटेलात स्वयंपाकाचे काम करु लागली.
या दरम्यान तिची विराज जगतापशी ओळख झाली. त्याने २०२० मध्ये पीडितेला जालना रोडवर स्वत:ची खोली तिला किरायाने दिली. १५ नोव्हेंबर २०२० रोजी त्याने तिला भावनिक करुन बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर वेळोवेळी त्याने लैंगिक शोषण केले. २३ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीचा शोध सुरु असल्याचे पिंक मोबाइल पथकाच्या उपनिरीक्षक मीना तुपे यांनी सांगितले.