पाटोदा शिवारात शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 18:59 IST2019-02-12T18:58:15+5:302019-02-12T18:59:40+5:30
आगीने त्यांचे जवळपास २ लाखाचा नुकसान झाले आहे.

पाटोदा शिवारात शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक
अंबाजोगाई( बीड ) : पाटोदा(म) शिवारात शॉर्टसर्किटने चार एकरवरील उस जळून खाक झाला. हे शेत मंगलबाई ठाकर या शेतकरी महिलेचे असून आगीने त्यांचे जवळपास २ लाखाचे नुकसान झाले आहे.
भीषण दुष्काळात अतिशय कठीण परिस्थितीत ठाकर यांनी ऊस जगवला होता. मात्र आज शेतामधून जाणाऱ्या वीजवाहिनीत घर्षण झाल्याने ठिणगी उडाली. यामुळे उसाला क्षणार्धात आग लागली. याबद्दल ठाकर यांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.