परळीत एसबीआय बॅंकेच्या जनरेटरला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:07 IST2018-05-29T18:07:30+5:302018-05-29T18:07:30+5:30
शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेच्या जनरेटरला आज दुपारी अचानक आग लागली.

परळीत एसबीआय बॅंकेच्या जनरेटरला आग
परळी (बीड) : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेच्या जनरेटरला आज दुपारी अचानक आग लागली. अग्निशमन दल व बँक कर्मचाऱ्यांनी आग ताबडतोब विझवली. मात्र, यामुळे बँकेचे कामकाज दुपारनंतर ठप्प झाले.
आज दुपारी राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. मात्र, दुपारी अचानक येथील जनरेटरला आग लागली. धुराचा लोट निर्माण झाल्याने तेथे बघ्यांची गर्दी झाली, तर बँकेतील ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. बँक कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलास दिली. आग विझविण्यासाठी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी व अग्निशमन दलाने प्रयत्न केले. यामुळे दुपारनंतर बँकेचे कामकाज ठप्प होते.