परळीत मोंढा मार्केटमधील दुकानांना भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 08:40 IST2018-08-20T07:32:28+5:302018-08-20T08:40:49+5:30
परळीत मोंढा मार्केटमधील मुख्य रस्त्यावरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

परळीत मोंढा मार्केटमधील दुकानांना भीषण आग
बीड : परळीत मोंढा मार्केटमधील मुख्य रस्त्यावरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. चार दुकानांना भीषण आग लागली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली.
शॉर्टसर्किटमुळे दुकानांना आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीत चार दुकाने जळून खाक झाली असून लाखोंचं नुकसान झालं आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थऴी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.