शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आष्टी तालुक्यातील फळबागा मोजताहेत अंतिम घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:42 IST

तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरी अनुदान ते पण दोन टप्प्यांत : पाणी विकत घेऊन फळबागा जगविण्याची वेळ

अविनाश कदम।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.आष्टी तालुका कायम दुष्काळी म्हणून समजला जातो. गतवर्षी पर्जन्यमान अतिशय कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जलाशय कोरडे पडले आहेत. तर रबीचे पीक पूर्णपणे हातून गेले आहे. कडधान्य नगदी पिकांना महागाईच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी फळबागाकडे वळले आहेत. सध्या तालुक्यात एकूण ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आंबा ३२१ हे., लिंबू २ हजार १९१ हे. , सीताफळ ३३७ हे., चिकू२१९ हे.,डाळिंब १ हजार ८७१ हे.,पेरू १०९ हे.,बोर १४.३५ हे.,आवळा ३६.२५हे., चिंच १३० हे., संत्रा ४१० हे., द्राक्ष १५ हे.,मोसंबी १.५० हे. इ .सर्व मिळून ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. १० हजार ४९६ शेतकरी लाभार्थी असून, फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी उपलब्ध असणारे पाणी दिले. परंतु मार्च महिन्यात पाणीपातळी खोल गेल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत तर शेतकरी हजारो रु पयाचे पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहे, ते पण हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यासमोर जळत आहेत. तर फळबागा जगवण्यासाठी शासनाने काही तरी उपाययोजना कराव्यात, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. नेहमी प्रमाणेच हेक्टरी १८ हजार रु पये तुटपुंजे अनुदान शेतकऱ्यांना देऊन पुन्हा एकदा निराशा केली आहे. ते अनुदान पण ९ हजार रुपये प्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे. या भयंकर दुष्काळात शासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा फळबाग शेतकरी करत आहेत.कृषी विभागाकडून ठिंबक सिंचन साहित्य खरेदी करण्यासाठी ४५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येत असून, महागाईच्या तुलनेत ते अतिशय कमी आहे. त्यामध्ये वाढ करु न ८० टक्के करण्यात यावे.शासनाने शेतकºयांना दुष्काळात फळबाग जगवण्यासाठी हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान जाहीर केले असून ते पण दोन टप्प्यात देण्याचे ठरवले आहे. १० हजार लिटर पाणी विकत घ्यायला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात.शासनाने दिलेले अनुदान अतिशय तुटपुंजे असून, शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासन करत आहे, असे कºहेवडगावचे शेतकरी अंबादास बांगर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रwater shortageपाणीटंचाई