सोयरिकीवरून २ गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:50 IST2018-11-12T00:49:39+5:302018-11-12T00:50:02+5:30
लग्नाची सोयरीक का मोडली, असे म्हणत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले

सोयरिकीवरून २ गटांत हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लग्नाची सोयरीक का मोडली, असे म्हणत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी आगेवाडी येथे घडली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल झाले.
भाच्याची जमलेली सोयरीक का मोडत आहात, असे म्हणत हनुमंत भिकाराव आघाव (आगेवाडी ता.केज) यांना ७ जणांनी बिअरची बाटली व काठीने मारहाण केली. वाहनांच्याही काचा फोडून नुकसान केले. तसेच त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. याप्रकरणी आरून आघाव, विक्रम आघाव, अर्जून आघाव, भिमराव आघाव, ज्ञानोबा आघाव, दत्ता आघाव, शाम आघाव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तर तुम्ही तुमच्या मावस बहिणीची लग्न आमचा मुलगा रमेश याच्यासोबत जमलेले असताना का मोडले, या कारणाावरून शाम आश्रुबा गित्ते (रा.बाणेगाव ता.केज) यांना चौघांनी बेदम मारहाण केली. लोखंडी गजाने मारहाण झाल्याने गित्ते गंभीर जखमी झाले होते. गित्ते यांच्या फिर्यादीवरून हनुमंत आघाव, आदिनाथ आघाव, भिकराम आघाव व नवनाथ मुंडे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.