अंबाजोगाईतून लढला जातोय ऊस वाहतूक ठेकेदार संपाचा लढा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:31 IST2018-10-06T00:30:39+5:302018-10-06T00:31:01+5:30

महाराष्ट्राच्या साखर उद्योगातील महत्वाचा घटक असणाऱ्या ऊस वाहतूक ठेकेदारांवर साखर कारखानदारांकडून वषार्नुवर्षे अन्याय केला जात आहे. महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने २४ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात बेमुदत संप पुकारला आहे.

The fight against the cane transportation contract is being fought in Ambajogai ...! | अंबाजोगाईतून लढला जातोय ऊस वाहतूक ठेकेदार संपाचा लढा...!

अंबाजोगाईतून लढला जातोय ऊस वाहतूक ठेकेदार संपाचा लढा...!

ठळक मुद्देदुप्पट दर, स्वतंत्र कराराच्या मुद्यावर संघटना आक्रमक : ऊस वाहतूक ठेकेदारांना न्याय मिळवून देणार- पवार

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : महाराष्ट्राच्या साखर उद्योगातील महत्वाचा घटक असणाऱ्या ऊस वाहतूक ठेकेदारांवर साखर कारखानदारांकडून वषार्नुवर्षे अन्याय केला जात आहे. महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने २४ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात बेमुदत संप पुकारला आहे. ऊस वाहतूक ठेकेदारांना न्याय मिळवून देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष रणजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस वाहतूक ठेकेदार बेमुदत संपाचे केंद्र हे अंबाजोगाई बनले आहे.
महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र असून संघटनेचे राज्यात हजाराहून अधिक सक्रिय सभासद आहेत. बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात संघटना प्रभावी कार्य करीत आहे. या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाºयांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच नुकताच पंढरपूर येथे संघटनेचा मेळावा घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष रणजित रामकृष्ण पवार यांनी सांगितले, या बाबत माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर तसेच बीडच्या जिल्हाधिकाºयांना प्रत्यक्ष भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व त्याबाबत चर्चाही केली. वाहतूक दर व कमिशन दर दुप्पट करून महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांत एकच दर लागू करावे व ही दरवाढ दरवर्षी सुधारित करण्यात यावी, ऊस वाहतूक ठेकेदार व ऊस तोडणी ठेकेदारांचे स्वतंत्र करार करावेत, अ‍ॅडव्हान्सची रक्कम वाहतूक ठेकेदारांना एकरकमी द्यावी, अ‍ॅडव्हान्ससाठी कर्ज प्रकरण करताना हे कर्ज प्रकरणे बँकांनी थेट वाहतुकदारांसोबत करावे, कारखान्यांनी दुहेरी करार करून कारखान्यांचे वाहतूक दर, कमिशन दर, बसपाळी इत्यादी सर्व गोष्टी करारात नमूद करून तसा करार वाहतुकदारांना लेखी स्वरूपात द्यावा, कारखाना बंद झाल्यानंतर सर्व हिशोब करून निघणारे बील, कमिशन, डिपॉझीट, बक्षीस रक्कम १५ दिवसांच्या आत वाहतुकदारांना देणे बंधनकारक करावे, अ‍ॅडव्हान्सची रक्कम फिटल्यानंतर दर पंधरवाड्याला होणारे बील वाहतूकदारांना नगदी देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर शेख अहेमद अमीन (उपाध्यक्ष), दिलीप लाखे (सचिव), युनुस बडेखाँ पठाण (कोषाध्यक्ष), शेख गुलाम मुस्तफा काले (सहसचिव), चंद्रकांत कदम, शेख अत्तार कशिर (दोघेही सदस्य) जिल्हाध्यक्ष अविनाश आदनाक, उपजिल्हाध्यक्ष मुजफ्फर पठाण व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
संघटनेचे हजाराहून अधिक सभासद
महाराष्टÑ राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेचे कार्यक्षेत्र हे महाराष्टÑ असून, संघटनेचे राज्यात हजाराहून अधिक सभासद असून, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यात विस्तार झाला आहे.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन
महाराष्टÑ राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष रणजित पवार म्हणाले, याप्रश्नाबाबत शरद पवार, आ. धनंजय मुंडे, मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर तसेच बीडच्या जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

Web Title: The fight against the cane transportation contract is being fought in Ambajogai ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.