Father, son killed in bus stop | बस-रिक्षा धडकेत पिता-पुत्र ठार
बस-रिक्षा धडकेत पिता-पुत्र ठार

केज : केजकडून चाकरवाडीकडे जाणाऱ्या रिक्षाला एसटी बसने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षामधील पिता-पुत्र ठार, तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
केज तालुक्यातील बरडफाटा परिसरात हा अपघात घडला. विक्रम अनवणे आणि दत्ता विक्रम अनवणे अशी मयतांची नावे समजली असून, केज येथे नातेवाईकांना भेटून आपल्या गावी चाकरवाडीकडे रिक्षाने येत होते. या अपघातात भूषण लहाने, गोविंद मोरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

Web Title: Father, son killed in bus stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.