Beed: वडील वर्ग-१ अधिकारी, आई प्राध्यापिका; दर्जदार शिक्षणासाठी मुलीला टाकले ZP शाळेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:16 IST2025-06-16T19:11:29+5:302025-06-16T19:16:12+5:30

उच्चशिक्षित देशमुख दाम्पत्यांने दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत जिल्हा परिषद शाळेला पसंती दिली. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

Father is a class-1 officer, mother is a teacher; Deshamukh husband wife daughter Sanika was sent to ZP school for quality education | Beed: वडील वर्ग-१ अधिकारी, आई प्राध्यापिका; दर्जदार शिक्षणासाठी मुलीला टाकले ZP शाळेत

Beed: वडील वर्ग-१ अधिकारी, आई प्राध्यापिका; दर्जदार शिक्षणासाठी मुलीला टाकले ZP शाळेत

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड):
दर्जेदार जिल्हा परिषद शाळा डावलून अनेक पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आहे. मात्र, याला देशमुख दाम्पत्य अपवाद ठरले आहे. अंबाजोगाई येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये जेष्ठ अधिव्याखाता श्रीकिशन देशमुख आणि लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील प्राध्यापक किरण तौर देशमुख यांनी आपल्या सानिका या पाच वर्षीय मुलीचा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. शहरापासून जवळ गुजर पंचशील नगर शाळेत पहिलीच्या वर्गात आज, सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी सानिकाचा प्रवेश झाला.

जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत असताना अशा प्रकारचा निर्णय ज्येष्ठ अधिव्याखाता श्रीकृष्ण देशमुख यांनी घेतला. ही बाब कौतुकास्पद मानली जात आहे. विशेष बाब, म्हणजे श्रीकिशन देशमुख यांच्या पत्नी किरण तौर देशमुख या माजलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहतात. सधन असताना देखील देशमुख दाम्पत्यांनी आपल्या पाच वर्षाच्या सानिका या मुलीचा प्रवेश  माजलगाव शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या सावरगाव केंद्र अंतर्गत गुजर पंचशील नगर येथील शाळेत घेतला आहे. तिला शाळेत येणजाणे करण्यासाठी रिक्षाची देखील सोय त्यांनी केली आहे. उच्चशिक्षित देशमुख दाम्पत्यांने दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत जिल्हा परिषद शाळेला पसंती दिली. त्यांच्या निर्णयाचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कौतुक होत आहे.

मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी
इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमांच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी मशीन सारखे घडवले जातात. त्यामुळे लहान मुलांना मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे. माझे शिक्षण देखील जिल्हा परिषद  शाळेत झाले आहे.
 - श्रीकिशन देशमुख , सानिकाचे वडील

Web Title: Father is a class-1 officer, mother is a teacher; Deshamukh husband wife daughter Sanika was sent to ZP school for quality education