दारूसाठी पैसे न दिल्याने वडिलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:02+5:302021-06-17T04:23:02+5:30

बीड : दारू पिण्यास पैशाची मागणी करून मुलांनी वडिलांना काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी ...

Father beaten for not paying for alcohol | दारूसाठी पैसे न दिल्याने वडिलांना मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याने वडिलांना मारहाण

बीड : दारू पिण्यास पैशाची मागणी करून मुलांनी वडिलांना काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे ११ जून रोजी ही घटना घडली.

याप्रकरणी वडील मच्छिंद्र सातपुते यांच्या फिर्यादीवरून मदन व पोपट सातपुते या मुलांविरुद्ध तलावाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक कोरडे करीत आहेत.

मोजणीबाबत तक्रार केल्याने मारहाण

बीड : मोजणी कार्यालय व कोर्टात मोजणीबाबत तक्रार का केली, अशी विचारणा करीत सय्यद अनवर सय्यद अली यांना चाकू, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीच्या लोखंडी तुंब्याने मारहाण करण्यात आली. माजलगाव तालुक्यातील वाघोरा येथे ही घटना घडली. याप्रकरणी फिर्यादीनुसार इकरार युनूस शेख, तौफिक युनूस शेख, मोहसिन इब्राहिम शेख व एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि इधाटे करीत आहेत.

Web Title: Father beaten for not paying for alcohol