भररस्त्यात डोळ्यात मिरची टाकून शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपये लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 14:39 IST2022-06-24T14:36:32+5:302022-06-24T14:39:56+5:30
थैली देण्यास प्रतिकार करताच त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली.

भररस्त्यात डोळ्यात मिरची टाकून शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपये लुटले
माजलगाव( बीड): तालुक्यातील लोणगाव येथील दोन शेतकरी येथील एका बँकेतून पैसे घेऊन जात असताना चोरट्यांनी कॅनल जवळ मोटर सायकल अडवुन व त्यांच्या डोळ्यात मिरची टाकत मारहाण केली. त्यांच्याजवळील साडेतीन लाख रुपये लुटण्यात आले.
उसाचे बिल आल्याने लोणगाव येथील जनार्धन कोळसे व गजानन कोळसे हे दोन बंधू पूर्णवादी बँकेतुन सव्वातीन लाख रुपये काढून गावाकडे मोटारसायकलवर ( एम.एच.2 ए.एस.0028 ) जात असताना माजलगाव - पात्रुड रस्त्यावरील कँनल जवळ तिघेजण मोटरसायकलवरून येत या दोन बंधुंच्या मोटरसायकलला मोटार सायकल आडवी लावली.
त्यांच्या डोळ्यात मिरची टाकली व यांनी थैली देण्यास प्रतिकार करताच त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली.यात त्यांच्या हातातील थैली खाली पडली त्यानंतर अज्ञात तीन चोरटे पैसे घेऊन पसार झाले. ही बाब ग्रामीण पोलीसांना कळवताच पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.