नित्रूड येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:51 PM2019-11-04T23:51:59+5:302019-11-04T23:52:25+5:30

शेतक-यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. तसेच पिकविम्यासाठी शेतक-यांना कोणत्याही जाचक अटी न लावता पीकविमा मंजूर करण्यात यावा. या मागण्याकरीता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नित्रूड येथे सोमवारी रोको आंदोलन करण्यात आले.

Farmers' Road Roko agitation at Nitrud | नित्रूड येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

नित्रूड येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी : रास्ता रोकोमुळे एक तास वाहतूक कोंडी; हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणी

माजलगाव : परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, उडीद, मूग यासह इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु प्रशासन मात्र पंचनाम्याच्या नावाखाली वेळ काढूपणाचे धोरण अवलंबत आहे. शेतक-यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. तसेच पिकविम्यासाठी शेतक-यांना कोणत्याही जाचक अटी न लावता पीकविमा मंजूर करण्यात यावा. या मागण्याकरीता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नित्रूड येथे सोमवारी रोको आंदोलन करण्यात आले.
या रस्तारोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर एक तास वाहतूक कोंडी झाली होती. या प्रसंगी माकपचे नेते कॉ. दत्ता डाके यांनी उपस्थित आंदोलक शेतक-यांना मार्गदर्शन केले. ओला दुष्काळ जाहीर करून पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, सन २०१८ मधील सोयाबीन पीकविम्या पासून वंचित राहिलेल्या शेतक-यांना विमा तात्काळ त्यांचा खात्यात जमा करा, प्रधानमंत्री सन्मान निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकºयांच्या खात्यावर सदर निधीचे हप्ते जमा करा, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, नित्रूड येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे सदर पूल पावसामुळे दोन्ही बाजूने खचला आहे. या पुलाचे व रस्त्याचे काम तात्काळ करून दिलीप बिल्डकाँन कंपनीने केलेल्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी, नित्रूड ते तेलगाव या महामार्गाचे काम करतेवेळी सदर दिलीप बिल्डकॉन कंपनीने रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाला न केल्यामुळे नित्रुड येथील शेतक-यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले व रस्त्याच्या शेजारी घरात पाणी शिरले. कॉ.दत्ता डाके, कॉ.संदीपान तेलगड, आबासाहेब गायकवाड, जनक तेलगड, रामा राऊत, सय्यद युनूस, शामराव राठोड, विजयकुमार डाके, पांडुरंग उबाळे, दत्ता घुले, पोपट गायकवाड, शेख खलील, गणपत पवार, राघवेंद्र कुलकर्णी, रामभाऊ पवार, अशोक डाके, अशोक तातोडे, नारायण तातोडे, सय्यद जिलानी, रामेश्वर गिराम, विकास डाके, नित्रूड परिसरातील शेतकरी आंदोलनात सहभागी होते.
दुष्काळात माणसी ३५ किलो धान्य द्या
सदर कंपनीकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकºयांना व मजुरांना रेशन दुकानातून या ओल्या दुष्काळात माणसी ३५ किलो धान्य पुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पत्की यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा केली आणि निवेदन स्वीकारले.

Web Title: Farmers' Road Roko agitation at Nitrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.