रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:14 IST2019-02-20T00:13:50+5:302019-02-20T00:14:10+5:30
खारी या भागातील सर्वे नंबर९३, ९४, ९५, १०१, ११५, ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आपली बैलगाडी जनावारांसह तहसील कार्यालयासमोर परिवारासह सुरू केलेले उपोषण दुस-या दिवशीही जारी होते.

रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : येथील खारी या भागातील सर्वे नंबर९३, ९४, ९५, १०१, ११५, ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आपली बैलगाडी जनावारांसह तहसील कार्यालयासमोर परिवारासह सुरू केलेले उपोषण दुस-या दिवशीही जारी होते. हा प्रश्न मार्गी लागल्या शिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे
धारूर शहरापासून चिंचपूर रोडवर अर्धा किमी अंतरावर खारी हा भाग आहे. या भागातील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना शेती वाहण्यासाठी अडचणी येत आहेत. आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या शेतातून जाऊ देत नाहीत ब-याचदा शेतातून गेल्यामुळे भांडणे व तंटे होत आहेत. त्यामुळे या शेतक-यांची एकूण १२५ एकर जमीन पडीक पडली आहे.
प्रशासनाला तीन वेळा निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची हालचाल न झाल्यामुळे आज मालू शिंपले, बाजीराव शेळके, माणिक गोंने, महादेव शेळके, बालू शेळके, सुखदेव शेळके, ओंकार पुजदेकर, वसंत शेळके, भगवान शेळके, सुखदेव फुनने, रवी मिसाळ, दीपक मिसाळ, मारुती शिंपले, पांडुरंग गोरे, सुधाकर थोरात, तुकाराम शिनगारे इत्यादी शेतक-यांनी पर्यायी रस्ता उपलब्ध करून या मागण्यासाठी तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दुस-या दिवशी त्यांचे उपोषण सुरूच होते.